नमस्कार,मी राजाराम प्रकाश काटवटे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा मानकरवाडी ता.शिराळा जि.सांगली सादर करीत आहे माझी मराठी शाळा हा ब्लॉग.

नवीन ब्लॉगवर जाण्यासाठी खाली क्लिक करा.

७५ वा स्वातंत्र्य दिन

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आज जिल्हा परिषद शाळा मानकरवाडी येथे हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज सोमवार दि.१५.८.२०२२ रोजी मानकरवाडी गावचे माजी सैनिक श्री.श्रीरंग म्होप्रेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात गावातील माजी सैनिक श्री.श्रीरंग म्होप्रेकर, श्री.पांडुरंग म्होप्रेकर , श्री.मारुती मानकर ,श्री.रामचंद्र मानकर , कै. कृष्णाजी मानकर ( जाधव ) यांच्या पत्नी शालन मानकर , कै.शामराव मानकर यांचा मुलगा विजयकुमार मानकर यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजयकुमार मानकर यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.पाटील सर यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांचा छोटासा भाषणपर कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले . त्यानंतर मोबाईलचे दुष्परिणाम यावर चर्चासत्र घेण्यात आले.सदर चर्चासत्रात सर्वांनी मोबाईलचा वापर कसा घातक आहे यावर आपले मत मांडले. यावेळी गावातील सैन्यदलात कार्यरत असणारे श्री.विजय नांगरे यांचे कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले.श्री.भैरवनाथ पाटील यांनी शाळेसाठी मदत म्हणून 500 रुपये दिले.गावातील ग्रामस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणलेला होता.अंत्री बु. ग्रामपंचायत यांच्यावतीने सर्वाना जिलेबीचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाची क्षणचित्रे खालील प्रमाणे-

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️




























No comments:

आपल्या प्रतिक्रिया येथे द्या.

Name

Email *

Message *